सन 2006 साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरु झालेला'निर्माण' हा युवांसाठीचा उपक्रम...
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध'ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून तरुणांसाठी विकसित केलेली ही एक शिक्षणप्रक्रिया...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या एका महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त दर महिन्याला आपल्यासाठी घेऊन येतील निखिल जोशीjosnikhil[at]gmail[dot]com, केदार आडकर kedaradkar[at]gmail[dot]comव सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी -http://nirman.mkcl.org,http://en.wikipedia.org/wiki/Nirman

Wednesday, 8 November 2017

संजय घोरपडेचे BAIF सोबत काम सुरु

निर्माण ७ च्या संजय घोरपडे याने BAIF या संस्थेत श्री. संजय पाटील यांच्या समवेत गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यामध्ये बियाणांच्या जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या प्रकल्पात काम करण्यास सुरवात केली. संजयच्या या नवीन कामाबद्दल ऐकुया त्याच्याच शब्दात...

निर्माण ७.१ चा कॅम्प झाल्यानंतर कोणत्या प्रकारचे काम करता येईल यासाठी महाराष्ट्रात भरपूर फिरलो. गावात काम करायचे असे ठरवले होते. पिकांच्या जैवविविधता संबंधित काम करण्याची संधी मला संजय पाटील यांच्याकडून मिळाली.
BAIF (Bharatiya Agro Industries Foundation) ही संस्था १६ राज्यांमध्ये वेगवेगळ्या शेती व रोजगार संबधित वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करते. त्यातीलच एक प्रोजेक्ट जैवविविधता संवर्धन असा आहे. महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन हे करत आहे आणि Indian Institute of Science, Education and Research (IISER), पुणे आणि BAIF यांच्याद्वारा या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु आहे. भात, मका, नाचणी, वरई, वाल, ज्वारी यांच्या बियांचे संवर्धन करून पुनरुज्जीवन करणे हे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे आता माझे M.Sc. (Biochemistry) चे शिक्षण आणि शेती यांची सांगड घालून काम करता येईल.
मी गडचिरोलीमधील एटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील गावांमध्ये भात आणि वाल यांची morphology study वनस्पतीची बाह्य स्वरुपाचा अभ्यास आणि संकरित जातींच्या प्राथमिक माहिती संकलन करणे, सहभागी ग्रामीण मूल्यमापन (PRA) पद्धतीने, गट चर्चेवरून माहिती मिळवणे, बीज प्रदर्शन करणे, अभ्यास क्षेत्रातील वैयक्तिक मुलाखत घेणे, लोकांना संकरित पिकांचे महत्व सांगणे, वेगवेगळ्या पिकांमधील संकरित जातीतील पिकांची निवड करून घेणे, गाव पातळीवर बियाणे साठवण्याचे केंद्र तयार करणे अशा प्रकारची कामे करणार आहे.
संजयला त्याच्या पुढील कामासाठी खूप शुभेच्छा!                         

                                                                                                                  संजय घोरपडे, (निर्माण ७)
                                                                                                     sanjayprofessional09@gmail.com
                                                                                               

No comments:

Post a Comment