सन 2006 साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरु झालेला'निर्माण' हा युवांसाठीचा उपक्रम...
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध'ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून तरुणांसाठी विकसित केलेली ही एक शिक्षणप्रक्रिया...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या एका महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त दर महिन्याला आपल्यासाठी घेऊन येतील निखिल जोशीjosnikhil[at]gmail[dot]com, केदार आडकर kedaradkar[at]gmail[dot]comव सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी -http://nirman.mkcl.org,http://en.wikipedia.org/wiki/Nirman

Tuesday, 5 September 2017

नव्या पिढीचे पत्रकार निर्माणी

पत्रकारितेचा प्रवास छापील वर्तमान पत्रे, रेडिओ, दूरदर्शनमधील सरकारी वाहिन्या ते अगदी खासगी वाहिन्या असा खूप झपाट्याने झाला. आता मात्र वेब पत्रकारिता आणि App Based News Channel चे युग सुरु झाल्याचे संकेत मिळत आहेत. या नव्या युगाची माध्यमे देखील नवी आहेत.
सायली खांडेकर (निर्माण ६) व प्रवीण शिंदे (निर्माण ७) यांची निवड  ETV Bharat या नव्याने सुरु होणाऱ्या App Based News Channel मध्ये कन्टेन्ट एडिटर म्हणून झाली आहे. ETV Bharat हा रामोजी समुहाचा नॅशनल न्युज प्लॅटफॉर्म आहे. हे व्हिडिओ सेंट्रीक मोबाईल अॅप आणि वेब पोर्टल असून सध्या ते इंग्लिश, हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये आहे.
BBC अर्थात ‘ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ ही माध्यमसंस्था देखील मराठी, पंजाबी, गुजराती आणि तेलुगू या चार भाषांत वृत्तसेवा सुरू करत आहे. पराग फाटक (निर्माण ७) व अनघा पाठक (निर्माण ५) ह्यांची BBC मराठीमध्ये निवड झाली आहे. पराग BBC च्या मराठी सेवेसाठी भाषांतरकार म्हणून काम पाहणार आहे तर अनघा सोशल मिडिया सेल सोबत काम करणार आहे. 
सायली, प्रवीण, पराग आणि अनघाला त्यांच्या या नवीन कामासाठी खूप खूप शुभेच्छा!

No comments:

Post a Comment