'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday 1 July 2017

'कर के देखो' चा मंत्र

जयश्री कुलकर्णी, निर्माण ७ चे शिबीर झाल्यावर, पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे ‘वयम’ या संस्थेसोबत प्रायोगिक तत्त्वावर काम करण्यासाठी गेली. ‘वयम’ ही संस्था जव्हारमधील आदिवासींच्या हक्कांबाबत जनजागृती आणि लोकशिक्षणाचे काम करते. तसेच महिलांसोबत आणि लहान मुलांसोबत त्यांचे इतरही काही उपक्रम चालतात. गेल्या तीन महिन्यात जयश्रीला ‘वयम’सोबत काम करताना आलेले अनुभव ऐकुया तिच्याच शब्दात...

निर्माण ७.१ चे शिबीर झाल्यापासून पुढे काय? याचं विचारचक्र चालूच होतं. फार झालं बोलणं – आता काम सुरू केलंच पाहिजे असं मार्च अखेरीपर्यंत ठरवलं आणि जव्हारला 'वयम'मध्ये काम करायला सुरवात केली. पालघर जिल्हा महाराष्ट्राची उत्तर सीमा. त्यातला जव्हार तालुका हा पूर्ण आदिवासी लोकवस्ती असणारा!
माझी आत्तापर्यंतची जीवनशैली आणि जव्हारमधली जीवनशैली यात ब-यापैकी तफावत होती. त्यामुळे इथं आपण कसे टिकणार? जमेल का आपल्याला? असे प्रश्न वासून उभे होते. कामाची सुरूवात मुलांबरोबर झाली. बिन बुका या शिका प्रकल्पाअंतर्गत पाड्यांत गंमत शिबीरं घ्यायची होती. पाड्यात जाऊन रहाणं हा आता कामाचाच भाग असणार होता. पहिल्याच दिवशी सुळ्याच्या पाड्यात रहायला होते. महिला का असेनात पण अनोळखी व्यक्तींच्या शेजारी झोपताना मनात असंख्य प्रश्न होते. वर पंखा नाही, मिणमिणता बल्ब होता फक्त. ती रात्र फक्त छताच्या लाकडी फळ्यांकडे बघत या कुशीवरून त्या कुशीवर वळत कशीबशी काढली. घरचा comfort  zone सोडून मी इथे का आलीये? काय ठेवलंय आयुष्यात पुढे? एकूणच - प्रचंड भिती, घुसमट, गोंधळ, प्रश्न यांची दलदल! पण त्याच क्षणी- हा मार्ग आपण स्वत:हून निवडलाय. असे खाचखळगे येणारच. हीच घडण - खरी परीक्षा आहे आपली असं समजावत होते आणि तथ्यही होतं त्यात, हे पुढच्या काही दिवसातच समोर येऊ लागलं, पटायला लागलं.


मुलांची निरागसता, त्यांची भडक नसणारी चमक, त्यांचं माझ्याभोवती सतत कोंडाळं करणं या सगळ्यामागे झाकली जाणारी त्यांची dark background आत्ता आत्ता लक्षात यायला लागलीये. या लहानग्यांबरोबर काम करताना मलाही स्वत:चे आजतगायत माहीत नसलेले पैलु उलगडायला लागलेत. इथला प्रत्येक दिवस नवा, ठरवलेल्या नियोजनाप्रमाणे गोष्टी घडतीलंच असं नाही. मग ती महिला बचत गटाची मिटिंग असो, PESA ची मिटिंग असो, मुलांना जमवणं असो. त्यामुळे निराशा आली तरी संयम ठेवणे आलेच. अजूनही पाड्यात गेल्यावर कधीकधी संडासातच आंघोळ करावी लागते, रात्री डास ही चावतात – भिती वाटते; पण थोडीशी मनाची तयारी करून गेलं की गोष्टी सोप्या, सुसह्य होत आहेत.
बिन बुका या शिकाद्वारे मुलांना मागील वर्षी त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल अशी खेळणी दिली होती. त्या खेळण्यांची मालकीही त्यांचीच. हीच मुले पुढे त्यांच्या जल जंगल जमिनीची मालकी घेतील. त्याचीच ही पायाभरणी! मुलांमधील नेतृत्व गुण वाढणे, संघटन वाढ, कल्पनाशक्ती या सगळ्याच गोष्टींना वाव देणारी शिक्षण पध्दती उभी करण्याची गरज आहे. ज्या पध्दतीत मुलं व्यक्त होऊ शकतात, आपल्या भावनांची मांडणी करू शकतात, विचार करून त्यावर कृती करू शकतात अशा पध्दतीची रचना करणं हा माझ्या कामाचा पुढचा महत्वाचा भाग असेल.


छोट्या संस्थेत पडणारी लहान-मोठी कामे, लोकांशी स्वत:हून संवाद साधणे, एखाद्या पाड्यात श्रमदानासाठी जाणे या सगळ्याकडेच, कुठल्याही कामाला कमी न लेखता एका नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज मला प्रकर्षाने जाणवली. इथे आल्यापासून इथल्या मूलभूत जीवनशैलीचे अनेक बारकावे अनुभवायला मिळाले. स्त्रिया कसलीही लाज न बाळगता सर्वांदेखत आपल्या मुलांना दूध पाजतात, पुरूष स्वयंपाक करतात, स्त्रिया घरं बांधतात. एकूणच स्त्री-पुरूष समानता, स्त्रीचा मान, निसर्गाशी जवळीक, त्याचे रक्षण हे सगळंच किती सहज, जीवनाचा अविभाज्य भाग असल्यासारखं घडतं. हीच नाहीत का निरोगी समाजाची लक्षणं?
कधीकधी आपण एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जातो तेव्हा इथे कसं आपल्या गावासारखं/ शहरासारखं नाही या नजरेतून पाहतो; पण ही तुलना, आपल्या समजुती काही काळासाठी बाजूला ठेवल्या तर नवं ठिकाण आपल्याला बरंच काही देऊन जातं!!!
जयश्री कुलकर्णी, निर्माण

CSR समजून घेताना


पापक्षालन कायदा”, “यांचे पैसे घेतले तर यांच्या विरुद्ध बोलायची सोय राहणार नाही”, “सामाजिक काम की कामाचा फक्त दिखावा फोटो सेशन पुरता”, “सामाजिक काम देखील आता प्रोफेशनल होणार”, “एवढा पैसा योग्य हातात पडेल तर खरंअसं काही बाही... CSR हा शब्द ऐकला की सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जनांत अशा प्रतिक्रिया चटकन उमटतात. मी देखील तसं पाहायला गेलं तर याच बाजूचा असल्याने या प्रतिक्रिया बरोबर की चूक, नाही हो ते तेवढेही वाईट नाहीत, अशी मत मांडण्याच्या फंद्यात न पडता हा नवीन CSR कायदा नक्की आहे तरी काय? हे विस्कटून पाहण्याचा प्रयत्न करतो. कारण चांगला वाईट जसाही असो हा नवा कायदा (खरं तर कायद्याचा एक भाग) सामाजिक क्षेत्राच्या सर्वच आयामांवर प्रभाव टाकणारा आहे; मग तो सामाजिक क्षेत्रात येणारा पैसा असो, या पैशाचे योग्य नियोजन असो, वा उद्योग क्षेत्राच्या सामाजिक क्षेत्राकडून असणाऱ्या अपेक्षा असो... तर आता हे पार्श्वभूमीचे पाल्हाळ पुरे करून विषयाला सुरवात करतो.
तर CSR कायदा समजावून घ्यायचा तर आधी तो ज्याच्या पोटात आहे तो Companies Act काय आहे ते जाणून घेऊयात.

Companies Act 2013 –
भारतातल्या कंपन्या (विशेषतः व्यक्तिगत कंपन्या) कशा चालाव्यात याचे निकष सांगणारा कायदा म्हणजेच Companies Act 2013. सन १९५६ मध्ये अस्तित्वात आलेल्या या कायद्यात २०१३ साली काही महत्वाचे बदल करण्यात आले. त्यातील आपल्या कामाचा बदल म्हणजे Section 135 – जो भारतातील उद्योगांची सामाजिक बांधिलकी उधृत करतो. खरं तर १९६५-६६ साली झालेल्या एका सेमिनारमध्ये उद्योग क्षेत्राची सामाजिक बांधिलकी काय असावी याबद्दल पहिल्यांदा चर्चेला सुरवात झाली. पण सध्या जो कायदा अमलात आला आहे त्याची पायाभरणी मात्र २००९ साली Ministry of Corporate Affairs (MCA) ने CSR संर्भात घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांपासून (मराठीत – guidelines) सुरु झाली आणि वर्ष २०१३ साली लोकसभा आणि राज्यसभेत पारित झाल्यावर ३० ऑगस्ट २०१३ साली हे बदल कायदा म्हणून लागू झाले.
खरं तर आपण निर्माणमध्ये नेहमी विचारतो त्या ‘म्हणजे काय’ आणि ‘कसं मोजणार’ या प्रश्नांचं सरकारी चौकटीतील उत्तर म्हणजेच कायदा. तर उद्योगांनी सामाजिक बांधिलकी सांभाळली पाहिजे असं जेव्हा सरकार म्हणतं, तेव्हा म्हणजे नक्की कोणी? काय केलं तर चालेल काय चालणार नाही? काम झालं हे कसं मोजणार? या सर्व प्रश्नांचा विस्ताराने उलगडा सेक्शन १३५ मध्ये केलेला आहे. यातील काही महत्वाच्या गोष्टी समजावून घेऊ -

हा कायदा कोणाला लागू होतो?
शेजारील आकृतीत दिल्याप्रमाणे section 135 अशा कंपन्यांना लागू होतो ज्यांची, एकूण वार्षिक उलाढाल १००० करोड रुपये (वा अधिक) आहे, किंवा ज्यांची एकूण मालमत्ता ५०० करोड रुपये (किंवा अधिक)आहे, किंवा, ज्या कंपनीचा निव्वळ वार्षिक नफा ५ करोड रुपये (किंवा अधिक) आहे. अशा सर्व उद्योगांना त्यांच्या नफ्यातील किमान २ % रक्कम सामाजिक कामांत गुंतवणे सक्तीचे आहे.

हे कामकाज कसे चालेल?
तर हा कायदा ज्या कंपन्यांना लागू होतो त्यांनी किमान ३ संचालक (Directors) असलेली समिती (Committee) स्थापन करणं गरजेचं आहे. या समितीमधील किमान एक जण स्वतंत्र संचालक असेल. या समितीच्या रचनेबद्दल कंपनीच्या संचालक मंडळाच्या अहवालात (Board’s Report) सविस्तर माहिती देणं बंधनकारक आहे.

या समितीची मुख्य कामे तीन
*       कंपनीसाठी Corporate Social Responsibility Policy बनवणे, त्यामध्ये कंपनीने कायद्यातीलschedule VII’ ला अनुसरून कोणती कोणती कामे करावीत याची माहिती दिलेली असेल. ही Policy कंपनीचे कामकाज पाहणाऱ्या संचालक मंडळाला सुपूर्द करणे.
*       या सामाजिक कामांसाठी कंपनीने किती खर्च करावा याची शिफारस करणे.
*       वेळोवेळी कंपनीच्या Corporate Social Responsibility Policy ची पडताळणी करत राहणे. (जसे की तिच्यात काही बदल करणे आवश्यक असल्यास ते पाहणे)

संचालक मंडळाच्या जबाबदाऱ्या
*       CSR समितीने केलेल्या शिफारसी लक्षात घेऊन कंपनीची Corporate Social Responsibility Policy मंजूर करणे आणि त्यातील बाबी (म्हणजे काय करणार, काय नाही, ते) कंपनीच्या अहवालात, तसेच कंपनीच्या वेबसाईटवर (अर्थात वेबसाईट असल्यास) जाहीर करणे.
*       या CSR policy मध्ये मंजूर केलेली सामाजिक कामे होत आहेत याची खात्री करणे.
*       कंपनीच्या वार्षिक सरासरी निव्वळ नफ्यातील (Average net profit) किमान दोन टक्के रक्कम त्याच आर्थिक वर्षात, किंवा त्यानंतर लागून येणाऱ्या तीन वर्षांत CSR policy मध्ये ठरल्याप्रमाणे खर्च होत आहे याची खात्री करून घेणे.
*       असे करताना कंपनी ज्या भागात काम करत आहे त्या भागातील गरजांना विशेष प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणे.
*       ही रक्कम खर्च करण्यास कंपनी अपयशी ठरल्यास तसे होण्याची कारणे त्यांच्या संचालक मंडळाच्या अहवालात नमूद करणे.

Schedule VII बद्दल
सामाजिक कामांसाठी खर्च म्हणजे नक्की कोणत्या प्रकारच्या कामांसाठी खर्च याची यादी शेड्युल सातमध्ये दिलेली आहे. १ एप्रिल २०१४ पासून लागू झालेल्या या शेड्युलमध्ये एकूण ११ विषयांचा समावेश आहे.
1.      भूक, गरिबी, आणि कुपोषणाचा नायनाट
2.      शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, रोजगाराभिमुख शिक्षण यांचा मुले, महिला, वयस्कर आणि अपंग यांमध्ये प्रसार
3.      स्त्रियांच्या हक्कांसाठी, सक्षमीकरणासाठी काम
4.      पर्यावरणाशी निगडीत कामे (जसे की प्राणी, पक्षी, वनस्पती आणि जीवसृष्टीचे रक्षण आणि संवर्धन)
5.      राष्ट्रीय वारसा असेल्या जागा, कला, हस्तकला, संस्कृतीचे रक्षण व संवर्धन
6.      सैन्य दलातील पिडीत सैनिक, मृत सैनिकांच्या विधवा, आणि इतर अवलंबून कुटुंबियांसाठी काम
7.      ग्रामीण खेळ, तसेच Olympic, Para Olympic खेळांसाठीचे प्रशिक्षण
8.      मागास, भटक्या विमुक्त जमाती, अल्पसंख्यांक आणि महिलांच्या विकासासाठी केंद्र सरकार करत असलेल्या निधी संकलनास, किंवा Prime Minister’s National Relief Fund साठी आर्थिक मदत
9.      शैक्षणिक संस्थांमधील तंत्रज्ञानाधारीत प्रयोग शाळांसाठी आर्थिक मदत
10.  ग्रामीण विकासाची कामे
11.  झोपडपट्टी विकासाची कामे
जरी CSR अंतर्गत केलेली कामे वरीलपैकी निकषांवर आधारित असणे बंधनकारक असले तरी हे काम नक्की कसे करायचे, त्याची व्याप्ती काय असावी हे कंपन्या ठरवू शकतील, जेणेकरून ही कामे अधिक परिणामकारक पद्धतीने करता येतील.

आता समजावून घ्यायचा शेवटचा (महत्वाचा) भाग म्हणजे सेक्शन १३५ अंतर्गत दिलेल्या कायद्यासंदर्भातील नियम. हे नियम देखील १ एप्रिल २०१४ पासून लागू झाले. या नियमांत कायद्यात वापरलेल्या विविध शब्दांच्या व्याख्या, तसेच CSR Policy, CSR activities, CSR Committee, CSR Expenditure, CSR Reporting, अशा महत्वाच्या गोष्टींचे विस्तृत स्पष्टीकरण दिलेले आहे. जसे की CSR activities मध्ये कुठल्या activities मंजूर होतात आणि कुठल्या नाही (उदा. कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी केलेली कामे, वा मॅरेथॉन मध्ये सहभाग अशा गोष्टी) हे या नियमावलीत स्पष्ट केलेलं आहे.

तर या लेखात आपण CSR बद्दल कायदा काय म्हणतो हे पाहिले. पण तो अमलात येत असताना काय होते, कंपन्यांचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे, सामाजिक संस्था याकडे कसे पाहतात, सामाजिक कामांचे आयाम यामुळे कसे बदलत जातील, अशा मर्त्य गोष्टींबद्दल पुन्हा केंव्हातरी पाहता येईल.
त्यासाठी तुम्हाला हा लेख कसा वाटला? CSR act कळायला मदत झाली का? तुम्हाला तो वाचताना काय प्रश्न पडले? हे मला सांगाल. जेणेकरून त्यानुसार मी पुढचा लेख कसा असावा हे नक्की करू शकेन.

तर आहे हे असं आहे!
पूर्वार्ध (म्हणूयात का?)

केदार आडकर, निर्माण ५

Book Review - To Kill A Mockingbird

Published in 1960, Harper Lee's debut and which for many years remained her only novel, To Kill A Mockingbird addressed issues which resonate even in our current circumstances. The characters so delicately constructed and so warmly presented are etched in our minds and continue to inspire us every time we go back to them. A recent example is Barack Obama quoting one of the characters in his farewell speech a few weeks ago, he said "If democracy is to work in our increasingly diverse nation, each one of us should pay her to the advice of one of the greatest characters of American fiction - Atticus Finch. Who said, you never really understand a person until you consider things from his point of view. Until you crawl under his skin and walk around in it"

On the surface the book may be about his children Jem and Scout Finch. It is, in most parts about them but the real, unassuming hero of this classic is their father, their only parent- Atticus Finch. Narrated from the point of view of the delightfully rebellious and remarkably smart for an 8 year old, Scout Finch, Atticus's humanity shines through throughout this book. Of course from the point of view of a young daughter, every father is a hero but Harper Lee gives us one and many reasons why he should be a hero for all of us, selective use of his shooting skills being one. The author also gives us reasons why we should go back to our childhood, unlearn the societal norms we've collected over time and re-learn the basic human values we're all born with but which get lost somewhere in our journey to adulthood.

The story follows the 3 children, Jeremy, Scout and their summer friend Dill who explore the bizarre ways of the adults of Maycomb County. A small, sleepy town in the state of Alabama, Maycomb County has its own share of racial prejudices. It was rudely shaken awake one day when a black man was charged with the rape of a white woman and their leading attorney, Atticus Finch chose to defend the case. I say chose even when it was an obligation he had to fulfil. I say chose even when the judge appointed Atticus to defend it. I say chose because he did. Atticus Finch put all his might in to give this poor man a fighting chance to prove his innocence even when he knew that a white man's word against a black man carries no weight. They may be equal before the law but society thinks otherwise and society doesn't even spare his 2 children who have to endure ugly comments about their father. But Atticus unlike most parents doesn't try to shield his children from this reality. Instead he warns them, he prepares them because he knows what he teaches them now will become the voice of their conscience later in life and as he very wisely says in the book, "The one thing that doesn't abide by majority rule is a person's conscience."

I know the summary sounds sad but the book isn't. It's warm, funny and full of childhood innocence. The author beautifully captures the image of a childhood. I was reminded of my own. Of summers spent with my brothers, getting involved in fist fights and patching up soon after though frankly I didn't have much luck with the fighting as Scout did, being the only, youngest, shrimpy little sister to my four brothers. I could also identity with Scout's indignation at being called a girl because back then "You're such a girl" was something akin to an insult. And in between these innocent, light hearted games of children lie the greatest beads of wisdom. The book pokes fun at hypocrisy, stereotypes, gender roles, court room drama all through the eyes of an 8 year old child. How, one might wonder! Children are supposed to be ignorant, naive little beings and in this assumption of ours is where we're wrong and wherein the genius of the author lies. Children do not view the world with a filter of prejudice. We do! Because they've not yet been taught to. Our general worldview, our stereotypes about people are something we've been taught and what we've picked up from observing the adults around us. This corruption of our innocence is brilliantly demonstrated in a conversation between Jem and Scout where Jem being four years older, classifies people of Maycomb County into four kinds while Scout, still young enough to stay untouched by this corruption simply says, "There's just one kind of folks, Jem. Folks!" There is another beautiful scene where Dill rushes out of the courtroom crying because the way the state lawyer cross-examined Tom Robinson was in Dill's words, sick! But not another soul in the court room, not even the blacks, flinched but it reduced Dill to tears. Children feel it in their hearts what is right and what is purely wicked. We? We've grown accustomed to; we've taken for granted what treatment is meted out to us and what we do to others. If we be honest with ourselves, Maycomb's general disapproval of the blacks and their way of life will remind us of something closer home. Our country has a long history of diversity but do we still not hear religious slurs here? Have we not tried to put down what we conveniently termed 'lower caste'? Have our attitudes changed?

It is almost impossible to do justice to this book in a review and my humble attempt does not even come close. To Kill A Mockingbird will remain one of the greatest works of fiction we've ever seen and a gentle reminder of our humanity for all those who read.

Komal Bhat, NIRMAN 7