सन 2006 साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरु झालेला'निर्माण' हा युवांसाठीचा उपक्रम...
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध'ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून तरुणांसाठी विकसित केलेली ही एक शिक्षणप्रक्रिया...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या एका महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त दर महिन्याला आपल्यासाठी घेऊन येतील निखिल जोशीjosnikhil[at]gmail[dot]com, केदार आडकर kedaradkar[at]gmail[dot]comव सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी -http://nirman.mkcl.org,http://en.wikipedia.org/wiki/Nirman

Wednesday, 31 August 2016

झलक मेळघाटची

प्रणाली कोठेकर (निर्माण ४) वर्ध्याच्या 'महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थे''सामाजिक आरोग्य' या विषयात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत आहे. 'Health literacy among mothers with children between 6 months to 24 months in tribal area about antenatal, intra-natal, post-natal and child health' हा तिच्या संशोधनाचा विषय आहे. संशोधनाच्या निमित्ताने मेळघाटला असताना तिला दिसलेले मेळघाट आपल्यासाठी-

 पावसाळ्याचे ४ महिने कुटुंब मुलाबाळांसह आपले घर शेतात हलवते. त्यामुळे लसीकरणासाठी आई व मूल बरेचदा सापडतच नाही.


 भाजलेल्या तंबाखूच्या पुड्या बांधताना बाबा व मुले


 आईवडील शेतीच्या कामासाठी गेले असताना बाळाला सांभाळताना 'मोठा' भाऊ


 ८ महिन्याची गरोदर स्त्री पाण्याच्या ४ घागरींसह


 जुगाड - भंगारवाल्या कडून बाथरूमला बसवून घेतलेले तिजोरीचे दार


कमी उंचीच्या पुलांमुळे पावसाळ्यात हमखास संपर्क तुटतो


प्रणाली कोठेकेर (निर्माण ४),

No comments:

Post a Comment