सन 2006 साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरु झालेला'निर्माण' हा युवांसाठीचा उपक्रम...
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध'ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून तरुणांसाठी विकसित केलेली ही एक शिक्षणप्रक्रिया...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या एका महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त दर महिन्याला आपल्यासाठी घेऊन येतील निखिल जोशीjosnikhil[at]gmail[dot]com, केदार आडकर kedaradkar[at]gmail[dot]comव सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी -http://nirman.mkcl.org,http://en.wikipedia.org/wiki/Nirman

Wednesday, 31 August 2016

कोमल नवले घणसोलीच्या नागरी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीआपल्या निर्णयप्रक्रियेबद्दल आणि विचारांबद्दल सांगतीय कोमल...

    "आयुष्यातील कदाचित सर्वात कठीण टप्प्यातून बाहेर पडल्यावर आता पुढे काय करायचे हा प्रश्न समोर आला तेव्हा मी खूप गोंधळले होते. पण मी सुरवातीलाच एक वर्ष काम करायचे आणि त्यानंतरच PG करायचे असे ठरवले होते, त्यामुळेच मी मेडिकल ऑफिसर म्हणून काम करायचे ठरवले. २० जून रोजी मी घणसोली गावातील नागरी आरोग्य केंद्रात रुजू झाले. तेव्हापासून मी रोज नवीन काहीतरी शिकत आहे. इथे फारच विविधता पाहायला मिळते. रुग्णाची भाषा, राहणीमान ते आरोग्याविषयीच्या संकल्पना, आजारांची माहिती या सगळ्यांचा मला पुढील आयुष्यात नक्कीच फायदा होईल. आजूबाजूला malpractice करणारे डॉक्टरही मला पाहायला मिळाले. एके ठिकाणी तर डॉक्टर ऐवजी कंपाऊंडरच practice करत होता. असे अनेक प्रकार निदर्शनास आले. पोलिसात तक्रार केल्यावर त्या बाबत कारवाई पण झाली. हे पाहून नक्कीच बरं वाटलं. RNTCP, NVBDCP इ.सरकारी योजनांबद्दल अधिक विस्तृत माहिती मिळाली. स्वावलंबन, कामाबद्दल अधिक माहिती आणि लोकांच्या अधिक जवळ जाऊन काम करण्यचा अनुभव मला इथे काम करताना मिळत आहे. आणि नक्कीच मला माझ्या या निर्णयाबद्दल आता कुठलीच शंका नाही.
कोमल नवले (निर्माण ५),

komal.nawale@yahoo.com

No comments:

Post a Comment