'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday 30 April 2016

साक्षर लोक अन्न साक्षर असतात का?

            गेल्या ४ वर्षापासून आकाश (निर्माण ६) बीजोत्सावामध्ये सहभागी होत आहे. प्रत्येकाच्याच रोजच्या जगण्यात अन्नाचे इतके महत्त्व असूनही याबाबत सगळे का बर इतके उदासीन असावेत? हा प्रश्न त्याला पडायचा. आपल्या परिसरात, आजूबाजूला इतके शेतकरी सेंद्रीय शेती करतात, तरी यांना हवा तसा प्रतिसाद का बर मिळत नसेल? सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ का होत नाही? Monsanto सारख्या मोठमोठाल्या बीजोत्पादक कंपन्या अन्न सुरक्षा आणि सार्वभौमत्वाशी का बर खेळत असतील? असे प्रश्न त्याला सतावत होते.
            माझ्या ताटात येणारं अन्न कुठून येत आहे? त्यावर काय काय प्रक्रिया होत आहे? माझे अन्न पिकवणारा शेतकरी कुठल्या अवस्थेत आहे? या प्रश्नांची उत्तरं बहुतेक लोकांना देता येत नाहीत. अन्न पिकवणारा आणि अन्न खाणारा यामधील ही दरी कमी करायची या अंगाने आकाशने नागपूरमध्येअन्न साक्षरताया विषयावर काम करायचे ठरवले आहे.
           
लोकांना अन्न आणि शेतकरी याबद्दल जागरूक करणे असे त्याच्या कामाचे स्वरूप असेल. याअंतर्गत आकाश आणि त्याची टीम शेतावर प्रत्यक्ष काम करायला गेले. शेतातील कामे केली. कामाचा आर्थिक मोबदला किती? हे जाणून घेतले. आणि कशाप्रकारे शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे याबद्दल समजून घेतले. अश्या छोट्या छोट्या अभ्यास सहलींचे नियोजन आकाश करतो. ज्याद्वारे लोकांना या सगळ्या गोष्टींचा नव्याने अनुभव मिळण्यास मदत होते. सोबतच नागपूर मध्ये सेंद्रीय शेतमाल आणि शुद्ध अन्न याबद्दल रविवारी सकाळी आणि सायंकाळी बागेसमोर जाऊन लोकांशी संवाद साधणे, विषमुक्त अन्न, अन्नातील भेसळ, GMO याबद्दल प्रश्न विचारून त्यांना जागरूक करणे अशी कामेही चालू असतातयेत्या २१ मे ला नागपूर मध्ये आकाश व टीम Monsanto कंपनी  विरोधात विशाल मोर्चा काढतो आहे आणि त्याच दिवशी सेंद्रिय शेतमाल वितरण केंद्राचे उद्घाटन पण होणार आहे. असा मोर्चा काढणारे नागपूर हे देशातील तिसरे तर आशिया खंडातील पाचवे शहर आहे.
            आकाशला तो करत असलेल्या कामात आर्थिक सहाय्य व्हावे म्हणून एका गृहस्थांनी फेलोशिप देऊ केली आहे. आकाश व त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल Times Of India मध्ये आलेल्या बातमीची लिंक - http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/group-pushes-safe-eating-through-organic-foods/articleshow/51870116.cms?from=mdr
            तुम्हीही नागपुरात असाल तर आकाशाला भेटूनअन्न साक्षरताया विषयाबद्दल अधिक जाणून घेऊ शकाल आणि त्याच्या या कामात जमेल ती मदत करू शकाल...
            आकाशला त्याच्या पुढील कामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
स्रोत: आकाश नवघरे, anaoghare@gmail.com

No comments:

Post a Comment