निर्माण ५ चा प्रफुल्ल शशिकांत ‘कुमार निर्माण’ (पूर्वाश्रमीचा महाराष्ट्र सोशल ऑलिम्पियाड) या उपक्रमाची धुरा सांभाळतो
आहे.शालेय वयोगटातील मुलांमध्ये सामाजिक बुद्धिमत्तेचा विकास व वैश्विक मानवी
मुल्यांची रुजवणूक करणे असे उद्दिष्ट असलेल्या 'कुमार निर्माण' या शैक्षणिक उपक्रमाने नुकतेच त्याच्या तिसऱ्या वर्षात मोठ्या दिमाखात पदार्पण
केले.
या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थी
आपापसात गट स्थापन करतात व स्थानिक पातळीवर आपल्या परिसरातील विविध प्रश ओळखायला
शिकतात, त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न
करतात. या मुलांसोबत एक वयस्क व्यक्ती निमंत्रक म्हणून जोडलेली असते.
कुमार निर्माणची दोन दिवसीय
प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पुणे येथे पार पडली, ही कार्यशाळा मुख्यतः गट निमंत्रकांसाठी होती. महाराष्ट्रातील
२० जिल्ह्यांतून ५२ गटांतर्फे आलेले ५० निमंत्रक, निर्माण युवा व स्वयंसेवकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश –कुमार निर्माणची संकल्पनाव कार्यपद्धती समजून घेणे,गट निमंत्रकाची मुलांसोबत काम करतानाची भूमिका समजून घेणे,हा होता.
या २ दिवसात विविध सत्रे घेतली
गेली. या सत्रांमध्ये शिक्षण व मूल्यशिक्षण म्हणजे नेमके काय; शिक्षणाचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध, सामाजिक व भावनिक बुद्धीमत्ता म्हणजे काय, मुल कसं शिकतं, माणसात उपजतच सहकार्याची भावना कशी असते, वैश्विक मानवी मुल्ये कुठली आणि त्यांचा आपल्या आयुष्याशी
असलेला संबंध यासारख्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या activities, उदाहरणे, लघुपट व खेळांच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेचा उपयोग
आपण आपापल्या गटासोबत काम करताना कसा होईल यावर विचारमंथन झाले.
निर्माण १ च्या सायली तमाने, सनत गानू, धनंजय माळी, निर्माण ५ चा केदार आडकर यांनी काही सत्रे घेतली.
नंदाकाकानी (नंदा खरे) देखील या कार्यशाळेत उपस्थित राहून सर्वांना प्रोत्साहन
दिले. तर निर्माण ६ चे सम्मीत वर्तक,अमोल दळवी, निरंजन तोरडमल, इशा घुगरी, गीता लेले, गणेश माळी, शैलेश जाधवयांनी हे प्रशिक्षण
शिबीर पार पाडण्यात खूप मोलाची मदत केली.
या प्रशिक्षणातून देण्यात आलेले
काही महत्वाचे विचार असे होते –
*
‘विद्यार्थी आपल्या ज्ञानाची निर्मिती स्वतः करत असतो’
*
‘आयुष्य हेच शिक्षण आहे’
*
‘कृतींमधून मुलांच्या वृत्तीमध्ये होणारा सकारात्मक बदल
महत्वाचा आहे’
*
‘कुमार निर्माण अंतर्गत मुलांच्या विविध कृती या फक्त माध्यम
आहेत, साध्य नव्हे’
या कार्यशाळेत शेवटच्या दिवशी, आधीपासून कुमार निर्माणशी जोडल्या गेलेल्या मुलांचा
कौतुकसोहळा मा. डॉ. अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या दोन वर्षांत अस लक्षात येत आहे
की निर्माण युवा व कुमार निर्माण मधील शालेय मुले यांच्यातील अनोखे नाते हळूहळू
आकार घेत आहे. कुमार निर्माण मध्ये निर्माण युवांचा वाढता सहभाग याचेच द्योतक आहे.
शैलेश जाधव व प्रणाली सिसोदिया
लवकरच प्रफुल्ल सोबत कुमार निर्माण साठी पूर्णवेळ काम सुरु करतील.
त्यांना आपल्या सर्वांतर्फे खूप
खूप शुभेच्छा!
कुमार निर्माण - एका निर्माणीच्या नजरेतून
कुमार निर्माण– अगदी नावावरूनच या उपक्रमाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागते!
समाजाशी
नाते जोडणे,आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी,समस्यांविषयी विचार करणे हेच मुळी आपण विसरून गेलोय. जसे जसे आपण मोठे होत
जातो तेव्हा जीवनचक्रात आपण असे अडकतो कि शेजारच्या घरात कोण राहते हे पण आपल्याला
माहित नसते. सर्वच लहान मुलांमध्ये समाजाप्रती संवेदनशीलता असावी मात्र त्याचे
रुपांतर नंतर संवेदनाहीन तरुणाईत होते.
लहान मुलांमधील हीच संवेदनशीलता जपण्याचे व योग्य पद्धतीने
वृधिंगत करण्याचे कठीण काम ‘कुमार निर्माण’
द्वारे चालू आहे.हे एक जागरूक पिढी घडवायचं काम आहे असेही म्हणता
येईल. अल्पावधीतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेल्या कुमार निर्माणच्या विविध
गटाच्या मुलांचे अनुभव ऐकण्याची संधी मला मिळाली.
पहिल्यांदा
कुमार निर्माण चा समन्वयक प्रफुल्ल शशिकांत याने आम्हाला या कार्यक्रमाविषयी
माहिती सांगितली.व जत तालुक्यातील एका टिमला भेट देण्याचे आम्ही ठरवले. मी, अरिंजय चौगुले व माझा लहान भाऊ त्या गटातील
मुलांना काही गोष्टी,खेळ शिकवावेया उद्देश्याने गेलो होतो.
पण त्या मुलांकडून आम्हीच खूप शिकलो.त्यांच्या sharing मधूनच
आमचेच learning झाले.
त्यानंतर
कुमार निर्माणची पुणे येथील स्थानिक सादारीकरण कार्यशाळा अनुभवण्याची संधी मिळाली.
पुण्याजवळील ५-६ गट तसेच अलिबाग येथीलएक गट मिळून साधारण ३५-४० मुले आपापल्या
गटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आली होती. ५वी ते ७वी या वयोगटातीलमुलेत्यांच्या
उपक्रमाची माहिती मोठ्या उत्साहाने व आत्मविश्वासाने सांगत होती,दुसऱ्या गटांना त्यांनी केलेल्या कामाविषयी
प्रश्न विचारात होती.‘वाहतुकीचे नियम पाळा व अपघात टाळा’,अश्या विषयांवरची पथनाट्ये सादर करत होती. फक्त चांगली कामे करण्यासाठीची
चढाओढ पहिल्यांदाच पाहायला मिळाली.
काही
मुलांनी सोसायटी मध्ये स्वच्छ भारत अभियान ची सुरुवात केलेली तर काहींनी
घराजवळच्या बागेची साफसफाई केली होती,काहींनी डोंगरावर झाडे लावून ती जगवली होती तर काहींनी शाळेतील समस्या सोडवण्यासाठी
मुख्याध्यापकांकडे विनंती केली होती. काहींनी गावातल्या समस्या साठी सरपंचाकडे
निवेदन दिले होते. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काही गट कापडी पिशव्यांचा
प्रचार करत होते तर काही गट फटक्यामुळे होणारे दुष्परिणाम लोकांना पटवून देत होते.
एका गटाने तर “प्रकाश वाटा” पुस्तकाचे
सामुहिक वाचन केले होते. एका मुलींच्या गटाने ' बांधकामावर
काम करणाऱ्या आजींना लागले असताना dettolआणून त्यांच्यावर
प्रथमोपचार केले.
वरवर
सोप्या वाटणाऱ्या या गोष्टी प्रत्यक्षात करायला खूप हिम्मत लागते. आपला comfort zone मोडून बाहेर पडावे लागते.
"लोक काय म्हणतील”याचा विचार न करता आपले काम करत राहणे
हे त्या मुलांकडून शिकण्यासारखे होते. हेच त्या' मुलांचे खूप
मोठे यश आहे अस मला वाटत.त्यांच्या कामाबद्दलची आणि विचारांबद्दलची त्यांची असणारी
स्पष्टता कौतुकास पात्र होती. मोठ्यांसारख्या ‘मी असे करेन,तसे करेन’अश्या गप्पान मारता ती खरीखुरी कामाला
लागली होती. आपल्याला जमेल त्याप्रमाणे आजूबाजूच्या समस्यांवर तोड काढत होती. या
कामगिरी पाठीमागे सर्वात मोठा वाट कुणाचा असेल तर तो त्यांच्या ‘निमंत्रकांचा - ताई /दादांचा’. आपली स्वतःची मते,स्वतःचे विचार मुलांवर न लादता सुद्धा मुलांना चांगले वाईट यातील फरक
ओळखायला शिकवणे हि मोठी कामगिरी ते समर्थपणे पार पाडत आहेत.
हे सर्व
कार्यक्रम मुलेशाळा व अभ्यास सांभाळून करत होती. विविध स्पर्धातून मिळणारे पैसे, खाऊचे पैसेकळत – नकळत
परत समाजसेवेसाठी वापरत होती. भविष्यातील कार्यक्रमांचे नियोजन करत होती. मुलांचे
पालक,शाळेतील शिक्षक अगदी वर्गातले मित्र सुद्धा या कामात
मदत करत होते हे पाहून नवल वाटले.‘कर के देखो’ हे निर्माण चे ब्रीदवाक्यच हि मुले जणू जगत आहेत.
प्रत्येक मुलाकडून काहीतरी शिकण्यासारखे होते. या
कार्यक्रमातून लहान मुलांमधील अफाट क्षमतेची जाणीव आम्हाला झाली. या
टेक-सॅव्हीदुनियेतकुमार निर्माण चे हे काम माणसाला माणसाशी जोडेल हे नक्की.
स्रोत: गीता
लेले, lelegeeta14@gmail.com
कुमार निर्माण – एका
निर्माणी निमंत्रकाच्या नजरेतून
जळगाव
येथे कचरा वेचणाऱ्या मुलांसोबत काम करणारा अद्वैत दंडवते (निर्माण ४) हा कुमार
निर्माण अंतर्गत निमंत्रक म्हणून कार्यरत आहे. या अनोख्या टिमच्या निमंत्रकाच्या
भूमिकेतून त्याचे हे मनोगत.
कुमार
निर्माणच्या आमच्या गटातील मुले मुली हि एक तर कचरा वेचक आहेत किंवा असंघटीत
क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची पाल्ये आहेत. कुमार निर्माणमध्ये आमची टीम
सहभागी करताना,या मुलांच्या दैनंदिन आयुष्यातच
इतक्या अडचणी, अडथळे आणि संघर्ष आहेत कि यातून बाहेर पडून ते
आसपासच्या सामाजिक प्रश्नांबद्दल काही करतील हि अपेक्षा आम्ही ठेवली नव्हती. पण
त्यांच्यात शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, संवेदनशीलता
यावी, वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा तसेच आपल्या परिसरातील
प्रश्नांकडे यांनी डोळसपणे बघावे असे मात्र आम्हाला नक्की वाटत होते.हे करताना
मुलांप्रती प्रेम, त्यांच्या मतांचा आदर असे काही मुलभूत
नियम आम्ही स्वत:शीठरवून घेतले आहेत.
कुमार
निर्माणशी संपर्क आल्यानंतर मुलांप्रती आपली वागणूक कशी असावी या बद्दल अधिक
स्पष्टता येत गेली. मुलांनी गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबवले. वृद्धाश्रमाला
भेट दिल्यानंतर मोठ्यांशी निट वागायचे ठरवले, यानंतर रस्त्यात कचरा करायचा नाही, स्वत:चे घर आणि
परिसर स्वच्छ ठेवायचा हे मुलांनी ठरवले आणि ते तसे वागले सुद्धा!
कुमार
निर्माणच्या विभागीय शिबिरात आमच्या टीमने इतर टीम्स समोर सादरीकरणकेले आणि
त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे याची जाणीव तेव्हा आम्हाला झाली. ही गोष्ट
आमच्यासाठी खूप उत्साहवर्धक होती.
माझ्या मते
कुमार निर्माणचे सगळ्यात मोठे यश म्हणजे मुल प्रश्न विचारायला शिकली आहेत. हे असे
का? आणि असे का नाही? असा
प्रश्न ती विचारतात याचाच अर्थ त्यांच्या विचारांना चालना मिळायला लागली आहे. आपण
सांगितलेले सगळेच खरे अस न मानता त्याबद्दल आधी खात्री करून नंतर त्यावर विश्वास
ठेवायला लागली आहेत. खरोखर, कुमार निर्माणमुळे मुलांना तसेच
आम्हाला सुद्धा एका आनंददायी शिक्षणप्रक्रियेचा भाग होण्याची संधी मिळाली आहे हे
नक्की.
स्त्रोत:
अद्वैत दंडवते, adwaitdandwate@gmail.com