सन 2006 साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरु झालेला'निर्माण' हा युवांसाठीचा उपक्रम...
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध'ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून तरुणांसाठी विकसित केलेली ही एक शिक्षणप्रक्रिया...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या एका महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त दर महिन्याला आपल्यासाठी घेऊन येतील निखिल जोशीjosnikhil[at]gmail[dot]com, केदार आडकर kedaradkar[at]gmail[dot]comव सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी -http://nirman.mkcl.org,http://en.wikipedia.org/wiki/Nirman

Thursday, 31 December 2015

शैलेश व प्रणाली पूर्णवेळ कुमार निर्माण मध्ये रुजू

कुमार निर्माणचा महाराष्ट्रभर  वाढत चाललेला पसारा बघता, नवीन कार्यकर्त्यांची गरज भासत होती. ती गरज प्रणाली आणि शैलेश यांच्या रूपाने पूर्ण झाली. प्रणाली ही M.Sc. Anthropology असून, मुळची धुळ्याची आहे. शैलेश (निर्माण ६) हा Mechanical Engineer असून मुळचा औरंगाबादचा आहे.
ह्या वर्षी कुमार निर्माणसाठी २१ जिल्ह्यांतून ४८ संघांनी नोंद केलेली आहे. आणि पुढे हा आकडा असाच वाढत जाणार आहे. प्रणाली आणि शैलेश पूर्णवेळ रुजू झाल्यामुळे हे काम अधिक गुणवत्तापूर्ण करता येईल असा प्रफुल्लला विश्वास आहे. कुमार निर्माणसमन्वयाच्या कामात हे दोघेही यापुढे प्रफुल्लसोबत काम करतील.


अद्वैत आणि मी जळगावला कचरा वेचणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करतो, ते काम आणखी चांगलं व्हावं, करता यावं, यासाठी कुमार निर्माणमधील अनुभवाची मला नक्कीच मदत होईल. तसंच, काम करण्याचं स्वातंत्र्य, समविचारी मित्रांसोबत काम करण्याची संधी हे कुमार निर्माणबद्दल मला भावलं. आणि काय? भटकायला तर आवडतंच!असं प्रणाली कुमार निर्माणला रुजू होताना म्हणाली.
शैलश कुमार निर्माणला रुजू होण्याआधी कोर्पोरेट क्षेत्रात काम करत होता, त्याचा प्रवास उलगडून सांगताना तो म्हणाला, “शिक्षण क्षेत्रात काम करायची इच्छा होती, कुमार निर्माणच्या रूपाने ती संधी माझ्याकडे आयतीच चालून आली आणि असा कोर्पोरेट पासून सुरु झालेला प्रवास कुमार निर्माणला येऊन थांबला.
दोघांनाही कामासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

स्रोत: प्रफुल्ल शशिकांत, Prafulla.shashikant@gmail.com  

1 comment:

  1. अभिनंदन दोघांचे...!

    ReplyDelete