'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 9 May 2013

तिनका तिनका जर्रा जर्रा



१३ एप्रिल २०१३ च्या Indian Express मध्ये Peter Ronald Desouza यांचा  लेख आहे, Why Politics Needs the Ashram नावाचा. लेखक शिमला येथील Indian Institute of Advanced Studyचे संचालक आहेत. त्यांच्या लेखाची सुरुवात अशी --
आश्रमातील जीवनावरच्या Ashram Observances in Action नावाच्या पुस्तिकेत गांधीजींनी आश्रम जीवनाचे नेमनियम नोंदले. शेवटी ते जे म्हणाले, ते मला नेहेमीच गुंगवत आले आहे. (ते लिहितात...) Last of all, when you have observed these rules, think that then, and not till then, you may come to politics and dabble in them to your heart's content, and certainly you will then never go wrong.”
(मला जाणवते आहे की काही 'जुने' निर्माणी मनात म्हणताहेत, “सैतानाच्या तोंडून बायबल!किंवा आणखी कठोर, “सौ चूहे खाके बिल्ली हज को चली!”)
मला आश्रम-जीवनाचे नियम काय आहेत किंवा काय असावेत यावर काही म्हणायचे नाही. त्या नियमांना मान्यता देऊन ते अंगवळणी पडल्याशिवाय राजकारणात ढवळाढवळ करू नये, हे गांधीजींचे म्हणणे आणि त्या म्हणण्याची श्री डिसूझान्वर पडलेली मोहिनी, या दोन्ही गोष्टी मला पटतात, आणि तुम्ही इंडियन एक्स्प्रेस वाचाल तर बहुधा तुम्हालाही पटतील. 
अत्ता मात्र मला शिक्षणप्रक्रियेतली एक गमतीदार बाब तुमच्यापुढे मांडायची आहे. शिक्षणाचा पाया म्हणा किंवा पहिले पाउल म्हणा, हे शिक्षकाने विद्यार्थ्यांना नियम घालून देण्यातून घडते. हे नियम विद्यार्थ्यांना पटवूनदिले जात नाहीत, तर ते आदेशअसतात. एक दोन उदाहरणे देतो. 
थोर तत्वज्ञ बर्ट्रांड रसेल भूमिती शिकायला सुरुवात करत होता. युक्लिडच्या पद्धतीने शिकवले जात होते, की आधी काही गृहीतके(axioms), मग त्यांपासून सिद्धांत (theorems)वगैरे. रसेलला एक गृहीतकच पटेना (कोणते ते मी सांगत नाही!). तो आठदहा वर्षांचा होता, आणि शिक्षकांशी हुज्जत घालायला लागला. शिक्षक म्हणाले, “हे मान्य केलं नाहीस तर पुढे काहीच शिकता येणार नाही.रात्रभर तळमळत जागे राहून मग रसेलने गृहीतक मान्य केले, तेही खिन्नपणे, की ते मान्य केल्याशिवाय पुढे शिकता येणारच नाही.
रसेलहूनही थोर तत्वज्ञ इमान्युएल कांट नीतिशास्त्र रचत होता. खूप विचारमंथनातून त्याने मूठभर नीतिनियम ठरवले. त्यांना नाव दिले “Categorical Imperatives”, अनुल्लंघनीय, निरपवाद आज्ञा! स्वतःच नियम करणारे असल्यासारखे वागा”, “इतरांवर किंवा स्वतःच्या अवयवांवर आपले निर्णय लादू नका”, वगैरे नियम कांटने दिले”. ते तसे का आहेत हे स्पष्ट करायला दोन अति-महा-बहु-अल्ट्रा-सुपर जड ग्रंथ लिहिले. पण होते ते आदेशच!
मी ना रसेलचे चरित्र वाचले आहे, ना कांट वाचला आहे. मित्रांकडून ऐकलेले सांगतो आहे. पण मुद्दा तो नाही. ज्ञानाची देवाणघेवाण करताना एका टप्प्यावर तरी लोकशाही”, “व्यक्तीस्वातंत्र्यवगैरे विसरून जाऊन शिक्षकांना हुकूमद्यावा लागतो. त्याशिवाय पुढे जाता येतच नाही!
                     
नंदा


No comments:

Post a Comment