सन 2006 साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरु झालेला'निर्माण' हा युवांसाठीचा उपक्रम...
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध'ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून तरुणांसाठी विकसित केलेली ही एक शिक्षणप्रक्रिया...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या एका महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त दर महिन्याला आपल्यासाठी घेऊन येतील निखिल जोशीjosnikhil[at]gmail[dot]com, केदार आडकर kedaradkar[at]gmail[dot]comव सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी -http://nirman.mkcl.org,http://en.wikipedia.org/wiki/Nirman

Tuesday, 4 December 2012

यशस्विनी पाटील धडगाव येथे रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत


निर्माण ४ च्या यशस्विनी पाटील हिने नुकतेच जनार्थ आदिवासी विकास संस्थेसोबत धडगाव येथे रिसर्च असोसिएट म्हणून काम सुरु केले. यशस्विनी हिने सामाजिक कार्यात उच्च शिक्षण (M.S.W) घेतले असून  ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हा तिचा स्पेशलायझेशनचा विषय आहे.

        Central Women’s Development Department अंतर्गत आदिवासी विकास संस्थेच्या मदतीने, JEEVA रिसर्च प्रोजेक्ट सुरु करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या दाईची (Indigenous midwives) माता व बालकाच्या आरोग्यात असणारी भूमिकाअसा ह्या रिसर्चचा विषय आहे. भारतातील ४ राज्यात महाराष्ट्र, बिहार, झारखंड व आसाम हे संशोधन होत आहे. ह्यामध्ये महाराष्ट्रात धडगाव जवळील ११ गावांचा समावेश आहे. तेथील पावरी व भिल्ल जमातींच्या लोकांशी संवाद साधणे, सर्व्हे करणे, केस स्टडिंचा अभ्यास करणे असे यशस्विनीच्या कामाचे स्वरूप आहे.

No comments:

Post a Comment