सन 2006 साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरु झालेला'निर्माण' हा युवांसाठीचा उपक्रम...
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध'ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून तरुणांसाठी विकसित केलेली ही एक शिक्षणप्रक्रिया...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या एका महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त दर महिन्याला आपल्यासाठी घेऊन येतील निखिल जोशीjosnikhil[at]gmail[dot]com, केदार आडकर kedaradkar[at]gmail[dot]comव सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी -http://nirman.mkcl.org,http://en.wikipedia.org/wiki/Nirman

Tuesday, 4 December 2012

निर्माण २ च्या पूनम राउतची पी. एस. आय. पदावर नियुक्ती

निर्माण २ च्या पूनम राउतची नुकतीच पी.एस.आय ( Police Sub Inspector)  पदी नियुक्ती झाली. तिला अमरावती (ग्रामीण) येथे पोस्टिंग मिळाले असून तिने  दोन महिन्यापूर्वी कामाला सुरुवात केली. लहानपणापासून पोलीस फोर्स मध्ये जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या पूनमने एम. पी. एस. सी. मार्फत आयोजित केलेली पी. एस. आय. ची परीक्षा उत्तम गुणांनी पास करून आपले स्वप्न खरे करून दाखवले. तिला तिच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

No comments:

Post a Comment