सन 2006 साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरु झालेला'निर्माण' हा युवांसाठीचा उपक्रम...
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध'ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून तरुणांसाठी विकसित केलेली ही एक शिक्षणप्रक्रिया...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या एका महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त दर महिन्याला आपल्यासाठी घेऊन येतील निखिल जोशीjosnikhil[at]gmail[dot]com, केदार आडकर kedaradkar[at]gmail[dot]comव सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी -http://nirman.mkcl.org,http://en.wikipedia.org/wiki/Nirman

Tuesday, 4 December 2012

डॉ. आशिष सातव यांच्या म. गांधी आदिवासी दवाखान्यात प्रेरणा राउत रुजू


चंद्रपुरची निर्माण ४ ची मैत्रीण डॉ. प्रेरणा राउत हिने नुकतेच आपले BHMS पूर्ण केले. भविष्यात नेमके काय व कुठे काम करायचे आहे हा शोध घेता घेता ती मेळघाटमधील धारणी तालुक्यातील डॉ. आशिष सातव यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी आदिवासी दवाखाना येथे रुजू झाली आहे. ती मृत्युदर नियंत्रण कार्यक्रम (Mortality control program) व लहान मुलांच्या अरोग्यासंदर्भातील उपक्रमांत योगदान देणार आहे. पहिल्या एका महिन्याच्या अनुभवाच्या आधारे ती पुढील कामासंदर्भात निर्णय घेईल. तिच्या या नवीन प्रवासासाठी व ध्येयाच्या शोधासाठी तिला शुभेच्छा!!

No comments:

Post a Comment