सन 2006 साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरु झालेला'निर्माण' हा युवांसाठीचा उपक्रम...
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध'ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून तरुणांसाठी विकसित केलेली ही एक शिक्षणप्रक्रिया...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या एका महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त दर महिन्याला आपल्यासाठी घेऊन येतील निखिल जोशीjosnikhil[at]gmail[dot]com, केदार आडकर kedaradkar[at]gmail[dot]comव सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी -http://nirman.mkcl.org,http://en.wikipedia.org/wiki/Nirman

Tuesday, 4 December 2012

निर्माणच्या खानदेश गटाची गांधीतीर्थला भेट


२ ऑक्टोबरला गांधी जयंती निमित्त, जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे गांधीतीर्थ, जैन हिल्स येथे युवकांसाठी एका चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. श्री. भवरलाल जैन ह्यांनी स्थापन केलेल्या गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे गांधी विचारांचा प्रसार व्हावा ह्या हेतूने त्यांचे साहित्य प्रकाशन, लायब्ररी  ऐतिहासिक प्रसंगांचे शिल्प, चित्र, खादी ग्रामोद्योग केंद्र इत्यादी चालवण्यात येते.
गांधी जयंती निमित्त चंद्रशेखर धर्माधिकारी ह्यांनी युवकांशी, महात्मा गांधींची व्यवस्थापन शैली व त्याचे आजच्या काळातील महत्व ह्यावर चर्चा केली. ह्या कार्यक्रमासाठी निर्माणच्या खानदेशातील गटाला विशेष निमंत्रण देण्यात आले होते. संदीप देवरे सोबत निर्माण गटाचे २० युवकांनी ह्या प्रसंगी गांधीजींचे विचार, जीवनशैली, आजच्या काळातील त्याचे महत्व ह्यावर युवकांशी संवाद साधला.

No comments:

Post a Comment