'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 4 December 2012

तिनका तिनका जर्रा जर्रा


आपल्या सर्वांचे लाडके गुरू (व त्याहीपेक्षा अधिक मित्र) श्री नंदा खरे (नंदा काका) ‘तिनका तिनका जर्रा जर्रा’ या स्तंभातून त्यांच्या वाचनातले सुंदर उतारे व त्यावर त्यांची टिप्पणी घेऊन येतील. त्यांनी आपल्याला दिलेल्या गवताच्या काड्यांचे सुंदर घरटे बनवणे ही आपली जबाबदारी आहे. 

स्टुअर्ट कॉफमन (Stuart Kauffman) हा कोलाहलशास्त्री (Chaos Theorist) आहे.
सुरुवातीला लहानसे असणारे फरक शेवटी फारच वेगवेगळे परिणाम घडवतात, हा कोलाहलशास्त्राचा एक महत्वाचा निष्कर्ष.
मागच्या "सीमोल्लंघन"मधला हा Butterfly Effect.
आज एका जागी फुलपाखरू पंख फडफडवते,
आणि काही वर्षांनी दुसऱ्या जागी वादळ येते!
कॉफमनच्या At Home in the Universe या पुस्तकातला हा उतारा, मुळातूनच घ्या--
In such a poised world, we must give up the pretense
of Long-Term prediction.
We cannot know the true consequences
of our own best actions.
All we players can do is be locally wise,
not globally wise.
All we can do, all anyone can do, is
    to hitch up our pants,
    put on our galoshes, and
    get on with it
    the best we can.
(galoshes म्हणजे आपण ज्यांना मराठीत (!) गम-बूट म्हणतो ते!)
तर काय, कॉफमन सांगतो की वाट चिखलाची, काट्याकुट्यांची असेल.
"मंझिल" स्पष्ट नसेल, पण
"करके देखो"!
               नंदा

No comments:

Post a Comment