सन 2006 साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरु झालेला'निर्माण' हा युवांसाठीचा उपक्रम...
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध'ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून तरुणांसाठी विकसित केलेली ही एक शिक्षणप्रक्रिया...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या एका महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त दर महिन्याला आपल्यासाठी घेऊन येतील निखिल जोशीjosnikhil[at]gmail[dot]com, केदार आडकर kedaradkar[at]gmail[dot]comव सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी -http://nirman.mkcl.org,http://en.wikipedia.org/wiki/Nirman

Tuesday, 4 December 2012

भुकेल्या गरीब रुग्णांपर्यंत अन्न पोहोचवण्यात सारंग जेवळीकरचा हातभार


पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये भरती (YCMH) असणाऱ्या गरीब रुग्णांना व्यंकटेश्वरा अन्नदान छत्रामार्फत मोफत जेवण पुरवण्याची जबाबदारी निर्माण ४ च्या सारंग जेवळीकरने घेतली आहे. सरकारी रुग्णालयात बऱ्याचदा मोफत उपचार झाले तरी तिथे भरती होणाऱ्या रुग्णांच्या जेवण्याची मोफत सोय नसते. त्यामुळे रोजंदारीवरचे मजूर, गरीब रुग्णांच्या जेवणाचे हाल होतात. ही समस्या लक्षात घेऊन व्यंकटेश्वरा अन्नदान छ्त्राचे श्री योगेशदादा मालखरे यांच्या सल्ल्यानुसार जवळच्या डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये MBA करणारा सारंग जेवणाचे डबे गरीब रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्या शिक्षणातून वेळ काढून करतो. हळूहळू एम.बी.ए. कॉलेजचे मित्रदेखील त्याच्यासोबत डबे द्यायला येऊ लागले आहेत. अन्नछत्रासाठी निधी संकलनाच्या कामातही हातभार लावण्यास त्याने सुरुवात केली आहे. तसेच गरजूंना वेळच्या वेळी रक्त मिळावे, घाईत असणाऱ्या रुग्णांना रात्री-अपरात्री झेरॉक्सची सोय उपलब्ध व्हावी यासाठी योगेशदादांसह सारंग प्रयत्नशील आहे.
प्रत्येक शहरात सरकारी रुग्णालय असते. सरकारी वैद्यकीय यंत्रणेत केंद्रापासून परिघावर फेकल्या गेलेल्या रुग्णांसाठी वैद्यकीय शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना कसे काम करावे याचे उत्तम उदाहरण सारंगने घालून दिले आहे. 

No comments:

Post a Comment