सन 2006 साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरु झालेला'निर्माण' हा युवांसाठीचा उपक्रम...
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध'ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून तरुणांसाठी विकसित केलेली ही एक शिक्षणप्रक्रिया...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या एका महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त दर महिन्याला आपल्यासाठी घेऊन येतील निखिल जोशीjosnikhil[at]gmail[dot]com, केदार आडकर kedaradkar[at]gmail[dot]comव सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी -http://nirman.mkcl.org,http://en.wikipedia.org/wiki/Nirman

Tuesday, 4 December 2012

त्रिशूल कुलकर्णी व सहकाऱ्यांचे औरंगाबादमध्ये वृक्षारोपण


औरंगाबादच्या MIT अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असणारा निर्माण ३ चा त्रिशूल कुलकर्णी, निर्माणचे काही मित्र, त्याच्या कॉलेजमधील काही प्राध्यापक आणि विद्याथी यांनी या पावसाळ्यात औरंगाबाद मध्ये वृक्षारोपण केले. 'सावित्री फुले महिला एकात्म समाज मंडळ' तर्फे चालवल्या जाणाऱ्या ओंकार बालवाडी परिसरात त्यांनी ५० च्या वर झाडे लावली. या उपक्रमात निर्माणचे अमोल वाकळे, केदार अनमोल व गौरव तोडकर सहभागी होते.

No comments:

Post a Comment