सन 2006 साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरु झालेला'निर्माण' हा युवांसाठीचा उपक्रम...
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध'ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून तरुणांसाठी विकसित केलेली ही एक शिक्षणप्रक्रिया...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या एका महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त दर महिन्याला आपल्यासाठी घेऊन येतील निखिल जोशीjosnikhil[at]gmail[dot]com, केदार आडकर kedaradkar[at]gmail[dot]comव सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी -http://nirman.mkcl.org,http://en.wikipedia.org/wiki/Nirman

Tuesday, 4 December 2012

डॉ. अश्विनी देशपांडेची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड


पुण्याची निर्माण ३ ची मैत्रीण अश्विनी देशपांडेची MPSC PSI या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे. ऑक्टोबर २०१२ पासून नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये तिचे एक वर्षाचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. तिचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा!

No comments:

Post a Comment